नारायण धारपांनी बावीसच्या आसपास भयकादंबर्या किंवा
दीर्घकथा लिहिल्या आहेत. त्यांच्या लघुकथांपेक्षा कादंबर्या मला जास्त प्रभावी वाटतात
आणि त्यामुळे आवडतात. त्यांच्या जवळपास सर्वच कादंबर्या मी वाचल्या आहेत, त्यातील एखादा अपवाद वगळता मला सर्वच आवडल्या आहेत. त्यापैकी काही तर इतक्या, की मी त्या अनेकदा वाचूनही त्या पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात. त्यापैकी
मला सर्वात जास्त आवडलेल्या पाच कादंबर्या
खालील प्रमाणे आहेत.
५) लूचाई -
नारायण धारपांचे हे सर्वात प्रसिद्ध
पुस्तक आहे असे म्हणायला हरकत नाही. हे पुस्तक बरीच वर्ष आऊट ऑफ प्रिंट होते, त्यामुळे काही वर्षांपूर्वी दुर्मिळ झाले होते. तेव्हा हे पुस्तक वाचण्यासाठी
किंवा मिळवण्यासाठी लोक अक्षरशा वेडी झाल्याचं मी पाहिले आहे. हे पुस्तकं स्टीव्हन
किंग यांच्या सालेम्स लॉट या कादंबरीवर आधारित
असले तरी धारपांनी त्याच रूपांतर अस काही केल आहे की वाचकाला या कादंबरीच मूळ कथानक
एका पाश्चिमात्य कादंबरीवर आधारित आहे हे सहसा जाणवत नाही.
आपल्या बायकोच्या अपघाती मृत्यूमुळे नैराश्यात असलेला
जयदेव पुन्हा आपल्या गावी येतो. पण गावात आल्यावर काही तरी वाईट बदल त्याला जाणवायला
लागतो. याचा शोध घेता घेता एक मोठ संकट गावात आलय याचा त्याला अंदाज येतो. पुढे कथा
अनेक वळण घेते, कथेच्या शेवटच्या टप्प्याच्या अगोदर तर वाचकाला
एक अनपेक्षित धक्का (किमान मला तरी तो एक धक्काच होता) बसतो. धारपांच्या काही मोजक्या
कथांपैकी ही एक कथा आहे, ज्यात शेवट सुरवातीला दिला आहे, एकंदरीत कादंबरी छान आहे पण काही लोकांना भयकथेला विज्ञानाचा दिलेला आधार
कदाचित रूचणार नाही. या कादंबरी बद्दल जास्त
काही सांगायची गरज नाही, मराठीतील सर्वोत्तम भयकथांपैकी ही एक
आहे. सध्या हे पुस्तक साकेत प्रकाशनने प्रकाशित केले असून सर्वत्र उपलब्ध आहे.
Ø पुस्तक
– लुचाई
Ø प्रकाशक
– साकेत प्रकाशन
Ø किंमत
– ३०० रुपये
४) शोध –
शोध हे देखील धारपांनी लिहीलेल्या सर्वोत्तम कथांपैकी
एक आहे.
ही धारपांनी लिहिलेली एक स्वतंत्र कादंबरी आहे. सुरवात वाचताना ही स्टीव्हन
किंगच्या डार्क हाल्फवर आधारित वाटते पण कथा पुर्णपणे वेगळी आहे.
लहानग्या
बळवंतच्या समोरच त्याचा पाळीव कुत्र्याचा अपघात होतो, त्या अपघाताने त्याच्यावर मानसिक परिणाम होतो व तो आजारी पडतो, पण तो यातुन बरा होतो. मात्र पुन्हा काही दिवसांनी त्याच्या डोक्याला वेदना
होऊ लागतात आणि मेंदूत ट्यूमर असल्याच निदान होत, पण हा ट्यूमर
साधा नसतो. बळवंतच्या मेंदूत झालेला हा ट्यूमर डॉक्टरांना सुद्धा कोड्यात पाडतो. बळवंतच्या
मेंदूयावर यशस्वी शस्त्रक्रिया होते, पण वाईट घटना इथेच थांबत
नाही, उलट इथूनच वाईट घटनांना खरी सुरवात होते. बळवंतच्या आयुष्यात
पुढे नक्की काय होत हे जाणून घेण्यासाठी शोध नक्की वाचा.
Ø पुस्तक
– शोध
Ø प्रकाशक
– साकेत प्रकाशन
Ø किंमत
– ३५० रुपये
सध्या हे पुस्तक फक्त ई – बूक स्वरुपात
अमेझोन किंडलवर उपलब्ध आहे, पण लवकरच साकेत प्रकाशनकडून पुस्तक
रूपात प्रकाशित होणार आहे.
३) परीसस्पर्श –
धारपांची परीसस्पर्श ही सुद्धा अशीच एक जबरदस्त
कथा. अजेयकडे सर्व काही असत अगदी सर्व एक स्वताच घर, चांगली नोकरी
आणि त्याच्यावर प्रेम करणारी एक प्रेयसी जिच्यासोबत लग्न करून तो सुखाने संसार करणार
होता, पण नियतीला हे मान्य नव्हतं. अचानक एके दिवशी त्याच्या मेंदूमध्ये वेदना व्हायल
सुरवात होते, सर्व तपासण्या झाल्यावर त्याला ब्रेन ट्यूमर असल्याच
निदान होत. डॉक्टर त्याला काही महिन्यांच आयुष्य शिल्लक राहिलय
अस सांगतो. हे ऐकून त्याला धक्का बसने साहजिक असत. ही बातमी ऐकल्यावर त्याची प्रेयसी
त्याला सोडून जाते. शेवटी अजेय एक निर्णय घेतो. नोकरी, आपल राहत घर सोडून एका
शेवटच्या प्रवासाला निघायच. कुठे जायचं हे ठरलेलं नसत, फक्त कुठे
तरी जायचं हेच नक्की असत. अश्यातच प्रवासात बसमध्ये त्याच्या डोक्याला पुन्हा वेदना
येऊ लागतात आणि त्याचवेळी त्याची भेट एका मुलीशी होते. तिथून पूर्ण कथानकच बदलून जात.
पुढे नक्की काय घडत ते जाणून घ्यायला नक्की परीसस्पर्श हे पुस्तक वाचा. हे पुस्तक साकेत
प्रकाशनने प्रकाशित केले असून सर्वत्र उपलब्ध आहे.
Ø पुस्तक
– परीसस्पर्श
Ø प्रकाशक-
साकेत प्रकाशन
Ø किंमत
– २५० रुपये
२)चेटकीण –
चेटकीण ही माझ्या आवडत्या कादंबरीपैकी एक, धारपांच्या अनेक कादंबऱ्या वाचल्या
पण खऱ्या अर्थाने भीती चा स्पर्श होऊन गेला तो चेटकीण वाचताना. सोनाली परदेशातून खूप
वर्षांनी भारतात येते, त्यातच तिला कळते की तिची आजी महिन्यापूर्वी
वारली व तिच्या कार्यासाठी तिला कोकणात श्रीवर्धन ला जायचे आहे. आजीच्या घरी आल्यावर
तिला कळयला लागते की तिची आजी सामान्य स्त्री नसते, आजीच्या घरासमोरील
ते बंद घर, अगदी सामान्य पण तरी घराबद्दल बोलायला सर्व नाखूष,
आजीने मृत्यूनंतर ठेवलेल्या विचित्र अटी आणि त्याच वेळी त्या बंद घरातील
दार उघडते, ती वाईट शक्ती मुक्त होते यातच सोनाली ला झालेली स्वतःच्या
वेगळेपणा ची जाणीव . सोनालीची आजी कोण होती? समोरच्या घराचे रहस्य
काय आहे?, सोनालीचा वेगळेपणा काय आहे असे अनेक प्रश्न सोनालीप्रमाणे
वाचकांना देखील पडतात. श्रीवर्धन च गुढ वातावरण , कादंबरीतील
रहस्यमय व्यक्तिरेखा, कादंबरीचं मुख्य पात्र एक नायिका,
मनुष्य वस्तीपासून दूर असलेली आजीची वाडी या सर्व कारणांमुळे वाचकांची
उत्कंठा क्षण क्षणाला वाढत जाते. सोनाली ला आजीच्या वेगळेपणा कळेल का?, त्या बंद घरातून बाहेर पडलेल्या त्या वाईट शक्ती परत त्या बंद घरात ती कैद
करेल का?, सोनाली होती तरी कोण? या सर्व
प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी चेटकीण जरूर वाचा. हे पुस्तक
साकेत प्रकाशनने प्रकाशित केले असून सर्वत्र उपलब्ध आहे.
Ø पुस्तक – चेटकीण
Ø प्रकाशक – साकेत प्रकाशन
Ø किंमत – २२५ रुपये
१)चंद्राची सावली –
नारायण
धारपांच्या एकपेक्षा एक अश्या सरस कादंबऱ्या मी वाचल्या आहेत, पण चंद्राची सावली ही माझी सर्वात
आवडती कादंबरी आहे.भयकथा प्रभावी असण्यासाठी भय व कथानक यांचं योग्य संतुलन असलं पाहिजे आणि चंद्राची सावली
त्याच एक उत्कृष्ठ उदाहरण आहे. जबरदस्त कथा, प्रभावी व्यक्तीरेखा,अप्रतिम वर्णने, सतत निर्माण होणार गूढ यामुळे क्षणक्षणाला
उत्कंठा वाढत जाते. गोसावी या उमदया पण बेकार तरुणाला छतारिया इस्टेटच्या व्यवस्थापकाची
नोकरी लागते. त्यासाठी त्याला दूर उत्तर प्रदेशात जावे लागते, तो आपल्या बरोबर भोरे हवालदार या निवृत्त सैनिकाला सहकारी म्हणून घेऊन जातो.
गोसावी आणि हवालदाराला आयुष्यात एक नवी संधी मिळते पण छतारिया इस्टेट ही भारलेली असते.भुतकाळात
तिच्या मालकाकडून अस काही घडत की त्या ठिकाणी एक वाईट अनैसर्गिक शक्ती निर्माण होते
आणि चंद्राच्या सावलीत तर ती अधिक सामर्थ्यवान होते. पुढें अश्या काही घटना घडतात की
गोसावी आणि हवालदार यांना आपण कुठल्यातरी मोठ्या संकटात सापडलो आहोत याची जाणीव होते.
पूर्वी इस्टेट वर काम करणाऱ्या च काय झालं?, छतारिया इस्टेटच
रहस्य काय आहे ? आणि ते त्या वाईट शक्ती विरुध्द कसे लढतील असे
अनेक प्रश्न त्या दोघांना पडतात पण त्या प्रश्नांची उत्तरे मिळताच त्यांच्यापुढे नवीनच
प्रश्न निर्माण होतात. त्यांना त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का?, की त्यांचाही शेवट इतराप्रमाणे होईल. मी मराठीतील अनेक भयाकथा वाचल्या आहेत
पण ही मी वाचलेली आतापर्यतची सर्वोत्कृष्ट भयकथा आहे. हे पुस्तक मीनल प्रकाशनातर्फे
प्रकाशित करण्यात आले आहे आणि याची किंमत मात्र ₹१२० आहे. जर
वाचली नसेल तर नक्की वाचा, तुम्हाला नक्कीच आवडेल.
Ø पुस्तक – चंद्राची सावली
Ø प्रकाशन – मीनल प्रकाशन
Ø किंमत – १२० रुपये
या पाच जरी माझ्या सर्वात आवडत्या असल्या
तरी आनंदमहल, दस्त, स्वाहा, वेडा विश्वनाथ आणि कुलवृतांत सुद्धा मला
फार आवडल्या. साठे फायकस सुद्धा अशीच एक कादंबरी जी मला सुरवातीला थोडी संथ वाटली
पण नंतर फार आवडली. तुम्ही नारायण धारपांच्या किती भय कादंबर्या वाचल्या आहेत आणि कुठल्या
तुम्हाला आवडल्या आहेत कमेन्ट करून सांगा.
(टीप – चक्रधर हा कथासंग्रह आहे आणि चक्रावळ ही विज्ञान कादंबरी, चेटुक ही समर्थकथा आहे आणि विश्वसम्राट एक दीर्घकथा)






मस्तच...अतिशय सुंदर संक्षिप्त विश्लेषण...मला धारपसरांची स्वाहा कुलवृत्तांत ,चेटकीण,लुचाई,चंदनवाडी ४४०,सैतान या फार आवडतात..अशी आवडीची यादी तयार करणे खुपच अवघड काम..कारण अजूनी धारपसरांच्या खूप कादंबरी आणि भयकथा संग्रह,समर्थ कथा आहेत ज्या मला वाचायला आवडतात..आणि सर्
ReplyDeleteमस्तच...अतिशय सुंदर संक्षिप्त विश्लेषण...मला धारपसरांची स्वाहा कुलवृत्तांत ,चेटकीण,लुचाई,चंदनवाडी ४४०,सैतान या फार आवडतात..अशी आवडीची यादी तयार करणे खुपच अवघड काम..कारण अजूनी धारपसरांच्या खूप कादंबरी आणि भयकथा संग्रह,समर्थ कथा आहेत ज्या मला वाचायला आवडतात..आणि सर्
ReplyDelete